माझ्या आतल्या आत चालत राहत एक अंतरद्वंद्व
ज्यात पत्करावीच लागते मला शेवटी हार,
फक्त तुझ्या विजयासाठी...
तू जिंकतोस त्यात, खरं तर जिंकल्याच्या भ्रमात राहतोस,
ओळखता येत नाही तुला त्यामागचं सत्य,
तुला वाटतं झालं, विरलं .. आता कशास धरावं अगत्य..
पण तुला हे कधीच उमजत नाही,
की क्षणिक गोष्टी विरतात,
या अशा मात्र आतल्या आत जिरतात..
✍️निकी
No comments:
Post a Comment