Tuesday, July 16, 2019

काळोख

ती म्हणते , "काळोखाला भीतं मन
काळा म्हणजे अशुभ…!!"
अग पण काळा फळा नाही का उजळवतो भविष्य,
काळा पोत तर बांधून ठेवतो त्याच्यासोबत तिचं आयुष्य...
काळ्या ढगातून तर आनंदघन बरसतो,
काळ्या मातीतूनच नाही का माझा काळा विठ्ठल डोलतो...!
काळोखच तर घेऊन येत असतो पाठीवरून सोनेरी पहाट,
काळोख म्हणजे चांदण पांघरलेला सुंदर घाट...!
म्हणून म्हणते नको हाऊस तू त्याच्यावर रुष्ट,
काळोख म्हणजे काय नव्हेत नुसते कष्ट...!
काळोख म्हणजे काय फक्त दिशाहीन भविष्य नाही..
अग वेडे, आईच्या गर्भातील काळोख इतका काही वाईट नाही...!

✍️निकिता विचारे