आयुष्यात येणाऱ्या सानुल्या झुळुकेकडून फारशी आशा लावू नये.ती अशीच मधेच केव्हातरी येणार न् सुखावून जाणार. तिला थोपवून मुठीत ठेवण्याचा वेडा प्रयत्न केलात तर ती कधी हातून निसटून जाईल आणि ओंजळ रीती होईल याचा काही नेम नाही.
हा पण तिचं स्वातंत्र्य न हिरावता तिच्या स्वच्छंदीपणाला दीर्घ श्वासात भरून हृदयात जपून ठेवू शकता. तेही "जगण्यासाठी तू हवीयस ग !" या विश्वासाने...
✍️ निकिता सु. विचारे
No comments:
Post a Comment