आस त्याला आभाळभर चांदण्यांची, मी अंगणी पडलेला प्राजक्ताचा सडा...
तो मुग्ध मोहक वेणूच्या नादी, मी मंगलसमयीचा सनई चौघडा..
मोह त्याला गोऱ्या रंगाचा , मी शामवेडी श्यामल राधा..
तो स्थिर शाश्वत सात्त्विक साधा, मी उनाड अस्थिर स्वैर बाधा...
तो अध्यात्मिक गंभीर भोळा, विषय त्याचा महाकाव्याचा...
मी अवखळ नाजूक मोहक सोहळा, साज माझा शृंगाराचा...
ठेका न आमचा एक तरीही चुकला ठोका हृदयाचा,
एक होऊनी गातो आम्ही सूर नवा हा प्रीतीचा...
✍️ निकिता विचारे
Khup Chan....shabdbharna....apratim
ReplyDeleteवा काय अर्थ आहे!
ReplyDeleteत्या दूरवर असलेल्या आभाळातल्या चांदण्याच्या मोहात, आपण अंगणातच असलेल्या आणि आपल्यासाठी स्वतःच्या अस्तित्वाचा सडा जमिनीवर रोजच घालणार्या प्राजक्ताला विसरून जात आहोत की काय असा प्रश्न पडलाय!
कृपया पुन्हां पुन्हां नीट लक्षपूर्वक वाचा. 🕉️💐🎹🎵😊🙏 भ्रमणभाष : ☎️ +९१९६१९५१६३७१ urisbood@gmail.com
Deleteछान !!����☺️��������
ReplyDeleteSuperb.. God bless you.
ReplyDelete