मराठी आपुली मुळातच आहे
रसाळ आणि प्रौढ रे
अभिजातच्या मुकूटाने
वाढेल तिचा डौल रे... ॥१॥
तिच्या जीवनाचा बदलत गेला आशय
अन् बदलत गेली अभिव्यक्ती रे
या वळणाचे सांगते मी विहंगमावलोकन
तू ध्यान देऊन ऐक रे... ॥२॥
प्रेरणा आणि आनंद
ही दोनही लक्ष्ये साधणारी
माझी मराठी ही अशीच आहे
चार जणांत अभिमानाने मिरवणारी... ॥३॥
मराठीच्या सारस्वत वृक्षावर
हे प्रथम पुष्प उमलले
विवेकसिंधूच्या रुपाने मुकुंदराजांनी
हिला गौरवाने झेलले... ॥४॥
महानुभाव पंथाने जेव्हा चढविला
माझ्या मराठीला साती ग्रंथाचा साज
रुप पाहुनीया स्वतःचे
आली या नवतरुणीला लाज... ॥५॥
ज्ञानदेव रचिला पाया तुका झालासे कळस
असे हे आपुले वारकरी संत
यांनी मोलाची भर घालूनीया
वाढविले मराठीचे ग्रंथ... ॥६॥
पंडिती काव्याने मराठीची
शोभा आणखी वाढविली
संस्कृतच्या वळणावर त्यांनी
माझी मायमराठी जोपासली... ॥७॥
पोवाड्यातून ओसंडला मराठीचा रांगडेपणा
अन् लावणीनेही जोपासला तिचा उनाड रंगेलपणा
शाहिरांच्या या गोड परंपरेने
नेहमीचाच
ताठरला मराठीचा गौरवी कणा... ॥८॥
आधुनिक साहित्यिकांनी आणि कलावंतांनी
दर्शन घडविले वास्तवाचे
त्यातूनच मराठीनेही हित जोपासले
स्वतःच्या अस्मितेचे... ॥९॥
अन्य धर्मियांच्या वाङमयाचाही
मराठीने नेहमीच केला आदर
विविधतेतून एकता
तिने आपल्या
कृतीतून केली सादर... ॥१०॥
अशी ही माझी
मराठी
आहेच हो कौतुकाची खरी
तिचा अभिमान येथे भरुन आहे
प्रत्येकाच्या उरी
प्रत्येकाच्या उरी... ॥११॥
Garv aahe mala mi marathi asalyacha
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDeleteKhup chhan kavita aahe .mala khup avadali ..madam tumchya kavita mala far avdatat
ReplyDeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDeleteKhup chhan kavita aahe .mala khup avadali ..madam tumchya kavita mala far avdatat
ReplyDeleteछान .आवडली कविता .
ReplyDeleteखुप छान आहे, माझीही छाती अभिमानाने भरून आली.. मनातल्या भावनाना शब्दांत मांडता येनाच सामर्थ्य आहे तुझ्यात, ते तसेच वाढौ हिच शुभेच्छा..
ReplyDeleteखुप छान आहे, माझीही छाती अभिमानाने भरून आली.. मनातल्या भावनाना शब्दांत मांडता येनाच सामर्थ्य आहे तुझ्यात, ते तसेच वाढौ हिच शुभेच्छा..
ReplyDeleteKhupch chhan
ReplyDeleteधन्यवाद ☺
ReplyDeleteधन्यवाद ☺
ReplyDeletekavita chhan ahech pan mazi chhoti tai sudha khup chhan ahe
ReplyDelete