या रक्षाबंधनला एक राखी घे. बांध स्वतःच स्वतःच्या मनगटावर आणि प्रतिज्ञा घे स्वतःच स्वतःच्या रक्षणाची. कारण आजही होतंय भर सभेत द्रौपदीचं वस्त्रहरण पण तिचा काळीज फाडणारा आक्रोश आभाळापर्यंत पोहचत नाही. आंधळ्या राजसभेत दडपला जातो तो. पांडव मुकाट्याने खाली मान घालून असह्य पाहत राहतात तिचं होणार चिरहरण. काही मेणबत्त्या पेटवून निषेध व्यक्त करण्यापलीकडे काय करणार हा हरलेला पुरुषार्थ ! आणि कृष्ण... ? कृष्ण आम्हाला फक्त दहीहंडीपुरताच आठवतो... !!!
✍️निकिता सु. विचारे