Saturday, November 7, 2015

कविता

चुकार नौका 


दुःख आहे पर्वता एवढे 
आणि सुख दिसतं कणाकणात 
तरीही जीवनाचा आनंद शोधते 
छोट्या छोट्या क्षणाक्षणात…. ll१ll 

भरकटलेली चुकार नौका 
आपल्याच धुंदीत वाहत राहिली 
भान येताच मागे वळून पाहिलं 
सगळी नाती तर दूर किनाऱ्यावरच राहिली .... ll२ll 

कोण दाखवेल किनारा ? 
कुणाला मारणार हाक ?
 कोण व्हलवेल आता 
कोण देईल तिला साथ? ….ll३ll 

मन चंचल हळव 
दुखावलं खर थोड 
पण आयुष्याचं तिचं हे 
तिलाच सोडवावं लागणार कोड ….ll४ll 

प्रत्येकाचे हजार प्रश्न 
हजारोंच्या टोचाऱ्या नजरा 
कसा करशील वेडे 
या साऱ्यांचा एकटीच सामना ….ll५ll 

हसतच म्हणाली मला ;
आभाळ पडलं माथी 
मात्र जिद्द अजून मोडली नाही 
शून्यातून निर्माण करेन विश्व 
बघ,मी अजून थांबले नाही ….ll६ll 

तू किनाऱ्यावरच थांब आणि 
दे मला थोडा वेळ 
तुझ्या माझ्या आयुष्याचा 
हाच तर आहे नवा खेळ ….ll७ll 

मन थोड झाल शांखित 
वाटली थोडी भीती 
कस गाठशील ध्येय 
कष्ट पडतील किती ! ….ll८ll 

जा सखे अशीच पुढे 
योग्यच आहे तुझा अट्टहास 
गाठून ये तुझे ध्येय 
मी इथेच थांबेन 
पाहत तुझ्या परतीची वाट ….ll९ll 

गेले किती पावसाळे 
त्यांची काही गणतीच नाही 
तिच्या काळजीपोटी मात्र 
इथे रातराणी कधी फुललीच नाही ….ll१०ll 

एक दिवस अशीच अचानक 
दिवसाचं फुलली रातराणी 
वाऱ्याची वेडी झुळूक 
गात आली तिच्या विजयाची गाणी ….ll११ll 

दाटून कंठ आला 
आले डोळा खारे पाणी 
अशावेळी दुसर काही होत नाही 
छळतात फक्त जुन्या आठवणी ....ll१२ll 

आता मिळालाय तिला 
तिचा हरवलेला तोच किनारा 
आता तीही अनुभवतेय 
आयुष्याचा गंध निराळा ....ll१३ll 

निकिता विचारे 

12 comments: