Wednesday, April 8, 2020

ती

     ही कथा आहे तिची...
     जी धावतेय रक्ताळलेल्या पावलांनी सोनेरी स्वप्नामागे. पंख पसरून घेतेय उंचच उंच भरारी. व्यापून टाकतेय संबंध आसमंत. कवेत घेऊ पाहतेय आभाळ समस्त... पडते, थकते, माघारी येते.. विसावते फांदीवर.. घेते क्षणिक विश्रांती.. मग पुन्हा एकदा भरारी घेते, ओठांवर तेच स्मित खेळवत..
     पाहणाऱ्याला वाटत किती स्वतंत्र, स्वयंपूर्ण आहे ही…! प्रेरणांचा स्रोत, आदर्श प्रतिमा, ती म्हणजे आदर, तिचा केवढा तो आधार…! 
     पण ती ……
     ती लपवत असते एक गहिरे दुःख, आत आत खोल रुजलेलं. तिचा आसमंत भेदणारा तो आक्रोश लपवत असते ती  तिच्या गुलाबी ओठांमागे. तिची आतून तुटलेपणाची डगमगलेली जाणीव सावरू पाहत असते ती तिच्या आत्मविश्वासू चालीत… 
     इतरांसाठी जरी ती असली स्थितप्रज्ञ तरी स्वतःसाठी आहे ती सत्व हरवलेली प्रतिमा, जी शोधतेय वेड्यासारखी स्वतःची ओळख. दाही दिशा फिरत राहते शोधत स्वतःच अस्तित्व...
     जे चोरीला गेलंय.. "त्याच्याकडून"

✍️निकिता सु. विचारे

1 comment:

  1. मोटिवेशनल, सामाजिक किंवा संदेश देणाऱ्या स्टोरी लिहता का ?

    मी शॉर्ट फिल्म करतो महाराष्ट्र एंटरटेनमेंट चॅनेल आहे youtube वर

    तुम्हाला जमलं तर आपण एकत्र काम करू शकतो

    nikitpatil01@gmail.com
    7045033455

    ReplyDelete