हे करायचय...!
आजकाल माझी मऊशार शय्या
रोजच टोचते मला अन् म्हणते,
आठवतोय का ग फूटपाथवर झोपलेला
तो चिमुरडा तुला.....ll१ll
पिज्जा बर्गरची पण चव आता
कडू वाटू लागलीय ,
जेव्हापासून ती उपाशी पोर
तुझ्या डोळ्यासमोर नाचू लागलीय .....ll२ll
एकीकडे तू करतेयस
तुझ्या भवितव्याच्या चर्चा ,
तिकडे ती लहानगी गोळा करतायत
रस्त्यावरचा कचरा .....ll३ll
या कचर्यातून त्यांना
बाहेर आणायलाच हवं ,
नुसतं विचार करुन कसं चालेल
त्या दिशेने तुला चालायलाही हवं .....ll४ll
चालता चालता भेटतील
तुला तुझे सगे सोयरे ,
मदतीला धावून येतील कधी
अनोळखी वाटसरूही सारे.....ll५ll
कुणी देईल दूरवर साथ
तर कुणी अर्ध्यातच फिरवेल पाठ ,
कुणी चांगलंय पुढे जा म्हणेल
तर कशाला नको ते व्याप म्हणून सुद्धा हिणवेल....ll६ll
सगळ्यांनाच हसून "हो" म्हणत
तुला मात्र अथक चालायचं आहे,
हतबल असणाऱ्या त्या नाजूक मुलांना
भटक्या जीवनातून बाहेर काढायचं आहे.....ll७ll
---------निकिता सु. विचारे
Superb....awesome... It is great starting n good step towards our society,n specially our generation to give a look on such issues...keep it up
ReplyDeleteThank u ☺
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteSuperb....
ReplyDeleteआयुष्यात भौतिक सुखापेक्षाही इतरांचे दुःख जाणून घेतल्याने त्यांचे दुःख हलके होते,वंचितांसाठीचा केलेला सामाजिक बांधिलकीचा विचार खूप मोलाचा आहे.
ReplyDeleteअस म्हणतात की'चांगल्या विचारतूनच कृती घडते,कृतीतून चांगल्या सवयी जडतात आणि अश्या सवयतीतून चांगले आदर्श व्यक्तिमत्व पर्यायाने भवितव्य घडते.