भडभडून नाही बोललास तरी चालेल ;
फक्त चारच शब्द मधात घोळवून बोल
मनाचं दार तुझ्या तू हळूहळू खोल..
पाहू दे मला आत येऊन असं काय घडलंय,
तुझ्यातलं लहान मुलं कुठे जाऊन दडलंय..
आणेन त्याला अलगद तळ हातावरून बाहेर
आजन्म जपेन, देईन प्रेमाचा आहेर..
तू फक्त परवानगी दे स्पंदनात उतरायची
हृद्यातलं दुःख रीते करत सुखाने ओंजळ भरायची..
✍️निकी
No comments:
Post a Comment