#सहजसुचलेलं
हल्लीच्या पिढीला प्रेमाची फारच घाई ! त्यांना असं सगळं instant हवं असतं, पण प्रेमाची आपलीच एक वेगळी गमंत असते. प्रेम जितक्या लवकर होतं तितक्याच लवकर ते संपतही ! म्हणून प्रेम हळूहळू करावं, लपत छपत जरा जपत करावं, वेळ देत वेळ घेत अलवार करावं, दिवसरात्र हिशेब न राखता वारंवार करावं, मग हळूहळू मुरतं, जिरतं आणि मग ते दीर्घकाळ उरतं!
✍️निकी
Wednesday, December 15, 2021
प्रेम
Tuesday, May 25, 2021
नातं...
तू मला विचारलंस,
"माझ्याजवळ ना पैसा, ना स्वतःचं घर,
साधी चारचाकी सुद्धा नाही..
तरी करशील माझ्याशी लग्न ?"
मी क्षणाचाही विलंब न करता 'हो' म्हटलं…
आतुरतेने म्हणालास,
"हे प्रेम म्हणावं की तडजोड ?
करत तर नाहीस ना कोणता त्याग ?"
अरे केवढे प्रश्न, कळेल हळूहळू
आता थोडा सबुरीनं वाग..
होता मला खरं तर तुझ्या मनगटावर विश्वास,
कर्तृत्वाने तू करशील हा भवसागरही पार..
खात्री होती मला तू पदरात टाकशील माझ्या
चांदण सुखाचं,
बस सोबत तुझ्या मला आधी खंबीर उभं रहायला हवं..
पैसा इतका मोलाचा नाही तो कमावता येईल दोघांना,
नजरेत फक्त आदर हवा जो बांधून ठेवेल मनाला..
पारखली होती मी तुझी हीच खात्रीशीर नजर,
तिच्यासाठीच मी केलं माझं सर्वस्व अर्पण..
माझ्या विश्वासाला कधी जाऊ देऊ नको तडा
कायम असाच शोभून राहो आपला अखंड जोडा..
निकिता सु. विचारे
Friday, January 8, 2021
"तू"
मला माझ्या सीमा कधी आखाव्याच लागल्या,
तर तू माझा किनारा व्हावं..
लागल्याच कधी संवेदना विरघळाव्या,
तर ते जलाशय तुझ्या हृदयी असावं..
जीवनाच्या रणभूमीवर झालेच कधी द्विधा,
तर तुझ्याच वाणीत कृष्णरूप दिसावं..
असित्वाच्या लढाईत झालीच माझी राख,
तर त्यातून फिनिक्स होऊन 'तू' उडावं..
✍️निकिता सु. विचारे