तू म्हणजे पंचपक्वान्नाचं ताट अचानक समोर आलेलं,
मी मात्र निर्जळ व्रत आजन्म घेतलेलं...
तू म्हणजे कृष्णाच्या बासरीची धून गहरी,
मी मात्र तुझ्या कथेतील हंसीण बहिरी...
तुला हवी माझ्याकडून रूक्मिणीची प्रीती ,
मला मात्र सदासर्वदा मीरेचीच स्मृती...
तुला कवितांचा नाद तुझ्या शब्दांत गोडी,
मी तुझ्यासाठी वेडी पण पायांत बेडी...
कसा होणार मिलाप आपला समोर उभे प्रश्न किती ,
त्यातच मला सावर म्हणता म्हणता तुझ्याच पडण्याची भीती...
.............निकिता सु. विचारे
अतिउत्तम ताई 👌
ReplyDeleteChan👌👌👌
ReplyDeleteChan👌👌👌
ReplyDelete