Wednesday, September 28, 2016

आठवणी

वेळ असेल तुझ्याकडे तर एक क्षण थांबशील का ?
फार नाही पण माझे दोन शब्द ऐकशील का ?

प्रेमाच्या या खेळात शब्द जरा जड अन् अश्रू वाटू लागतात हलके,
म्हणून माझ्या ओठांपेक्षा डोळेच वाटतात अधिक बोलके....

माझ्या डोळ्यांतले हे मुके भाव अलगद समजून घेशील का ?
अख्ख आयुष्य नको पण क्षणभर साथ देशील का ?

त्या क्षणातच मी माझं सारं आयुष्य जगणार आहे,
नंतर तुझ्याविना जगायला आयुष्य कुठे उरणार आहे...

माझ्या या आर्ततेचा फक्त एकदा विचार करशील का ?
तळमळणाऱ्या माझ्या मनाला दिलासा थोडा देशील का ?

देव्हाऱ्यातला दिवा आता वातीवाचून जळणार आहे ,
पौर्णिमेची प्रीतही चंद्रावाचून सरणार आहे...

खोटाच मुखवटा घेऊन का होईना  मी मात्र हसणार आहे,
तुझ्याविना झुरतच का होईना हे शापित जीवन जगणार आहे...

जाणून आहेस मनीचे सारे भाव तरी दूरूनच पाहतोस,
तुलाही माहित आहे दूर असलास तरी तू माझ्यातच उरतोस ......



.......निकिता विचारे

4 comments: